मुंबई – शिवसेनेत बंड केल्यानंतर बंडखोर आमदार आणि त्यांचे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटे लात वास्तव्याला आहेत. या आधी ते सुरतेतील हॉटेलात राहात होते. या हॉटेलची बिले कोण भरतो आहे असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
यासाठी काळ्या पैशाचा वापर होतो आहे काय याचा ईडी आणि आयकर विभागाने तपास केला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी विचारले आहे की, “सुरत आणि गुवाहाटी येथील हॉटेल्सचे तसेच चार्टर्ड फ्लाइटचे बिल कोण भरत आहे? प्रत्येक आमदारांच्या हॉर्सट्रेडिंगचा दर 50 कोटी रुपये आहे हे खरे आहे का?” या बाबतीत ईडी आणि आयटी सक्रिय झाल्यास, काळ्या पैशाचा स्रोत उघड होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.