कोण आहे हा युसुफ अझर? 

भारताने हवाई हल्ल्यात बालाकोट येथील जैशचा जो तळ उद्धवस्त केला त्या तळाचा प्रमुख म्हणून मौलाना युसुफ अझर हा काम करीत होता. डिसेंबर 1999 मध्ये काही अपहरणकर्त्यांनी नेपाळ मधून भारताचे जे विमान पळवले होते त्या अपहरणकर्त्यांमध्ये युसुफ अझर हाही एक होता असा कयास आहे.

हे विमान काठमांडूहून अफगाणिस्तानात कंदहारला पळवून नेण्यात आले होते. त्यातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात मौलाना मसुद अझर आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांची सुटका त्यांनी करून घेतली होती. भारत सरकारने या तीन अतिरेक्‍यांना विशेष विमानाने अफगाणिस्तानात नेऊन अपह्त विमानातील भारतीय प्रवाशांची सुटका केली होती. सीबीआयच्या वेबसाईटवर युसुफ अझरचे जन्मस्थळ कराची आहे असे नमूद करण्यात आले असून तो उर्दु आणि हिंदी भाषा बोलतो. अपहरण, हत्या आणि अन्य दहशतवादी कारवायांबद्दल सन 2000 साली इंटरपोलने त्याला वॉन्टेडच्या यादीत टाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.