Television | भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक कमाई करणारा कलाकार प्रत्येक एपिसोड मागे पाच कोटी रुपये घेतो. त्यामुळेच त्याची वैयक्तिक संपत्ती तीनशे कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे. सध्या टेलिव्हिजन विश्वात सास-बहू मालिकांचे वर्चस्व आहे. या मालिका सातत्याने टीआरपी मध्ये आघाडीवर असतात.
मात्र सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत या मालिकांमधील कुणीही नाही. या मालिकेतील अभिनेत्री रूपाली गांगुली ही प्रत्येक एपिसोड मागे तीन लाख रुपये घेते. तिची या मालिकेतील अनुपमा नावाची भूमिका अतिशय लोकप्रिय आहे. तेजस्वी प्रकाश ही अभिनेत्री स्वरागिनी आणि नागिन-6 मधील भूमिकांमुळे प्रसिद्ध आहे. असे असले तरी या कलाकारांना सर्वाधिक मानधन मिळत नाही.
View this post on Instagram
सर्वाधिक मानधन घेण्याचा मान कपिल शर्माला
टीव्ही विश्वातील सर्वाधिक मानधन घेण्याचा मान विनोदवीर कपिल शर्माकडे जातो. कपिल शर्मा हा द ग्रेट इंडियन कपिल शो सूत्रधार आणि सर्वेसर्वा आहे. तो प्रत्येक भागासाठी मानधन म्हणून पाच कोटी रुपये घेतो. आता त्याची एकूण संपत्ती तीनशे कोटी रुपयांवर पोचली असल्याचे डीएनए आणि फर्स्ट पोस्ट मधील बातमीत म्हटले आहे.
कपिल शर्माने 2007 मध्ये द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या सिझन तीनचे विजेते पद मिळवले. त्यानंतर तो कॉमेडी नाईट विथ कपिल हा कार्यक्रम 2013 पासून करू लागला. नंतर त्याचा द कपिल शर्मा शो 2016 ते 2023 पर्यंत चालला. त्यातून त्याने भारतीय टेलिव्हजन विश्वात सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार किंवा विनोदवीर म्हणून स्वतःचे स्थान पक्के केले.
सुनील ग्रोव्हर एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो?
दरम्यान, त्याचा एकेकाळचा सहकारी सुनील ग्रोव्हर आता द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये प्रत्येक भागामागे पंचवीस लाख रुपये मानधन घेतो. तो देखील यशस्वी कलाकार आहे. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये येणाऱ्या अभिनेत्यांची नावे पाहिली तर त्यामध्ये रणबिर कपूर, अलिया भट, करण जोहर, सैफ अली खान, जानव्ही कपूर यांची नावे आहेत.
कपिल शर्माची संपत्ती
कपिल शर्माने अंधेरी मध्ये अलिशान अपार्टमेंट खरेदी केले असून त्याची किंमत पंधरा कोटी रुपये आहे. त्या ठिकाणी तो त्याची आई पत्नी गिन्नी आणि दोन अपत्यांसमवेत राहतो. त्याखेरीज चंदीगड जवळ त्याचे आलिशान फार्म हाऊस आहे. ज्याची किंमत 25 कोटी रुपये आहे. कपिल शर्माकडे आलिशान गाड्यांचा ताफा आहे.
त्यामध्ये वोल्वो एक्स सी 90, मर्सिडीज बेंज एस 350, रेंज रोवर आणि त्याखेरीस त्याला कामानिमित्त लागणारी व्हॅनिटी व्हॅन त्याने खास डिझाईन करून घेतलेली आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत 5.5 कोटी रुपये आहे. यातूनच तो टेलिव्हिजन विश्वातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेता असल्याचे स्पष्ट होते.