‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकची हिरोईन कोण?

अमिताभ बच्चन यांच्या 1982 सालच्या सुपरहिट “सत्ते पे सत्ता’चा रिमेक होणार, असे जेंव्हापासून समजले तेंव्हापासून लीड रोलमध्ये हृतिक रोशनबरोबर हिरोईन कोण असणार याबाबतची चर्चाही व्हायला लागली आहे. या सिनेमासाठी जे सुचेल त्या हिरोईनचे नाव सुचवले जायला लागले आहे. मूळ सिनेमामध्ये अमिताभ यांच्याबरोबर हेमामालिनी होत्या. आता हृतिकबरोबर दीपिकाचे नाव घेतले जायला लागले आहे. कारण हृतिक आणि दीपिका यांनी आतापर्यंत एकत्र कामच केलेले नाही.

मात्र दीपिकाच्या “छपाक’ आणि “83′ च्या शुटिंगमुळे तिच्याजवळ 2021 पर्यंत तारखाच रिकाम्या नाहीत. त्यानंतर कतरिन कैफच्या नावाचीही चर्चा झाली. पण कतरिना आणि हृतिक यांनी पूर्वी “जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि “बॅंग बॅंग’मध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे ही जोडीही होण्याची शक्‍यता मावळली. कारण “सत्ते पे सत्ता’च्या रिमेकसाठी फ्रेश पेअर पाहिजे आहे. आता हृतिकच्या बरोबर क्रिती सेनॉनच्य नावाची चर्चा व्हायला लागली आहे. कारण या दोघंनी अतापर्यंत एकत्र काम कधीच केलेले नाही. मात्र हृतिक बरोबर नवोदित हिरोईनला संधी दिली जण्याची शक्‍यता असल्याचे फराह खानच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. ही नवोदित म्हणजे अगदी मानुषी छिल्लरही असू शकते. कारण फराह खानच्या सर्वाधिक संपर्कात मानुषी आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आघाडीच्या हिरोबरोबर काम करण्यासाठी हिरोईन मिळतच नाही आहे. प्रभासबरोबर “साहो’मध्ये काम करण्यासाठीही हिरोईनचा अशाच प्रकारे शोध घ्यायला लागला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)