‘कोण हिरो आणि जोकर कोण’; भाजप आमदाराची राहुल गांधींवर खोचक टीका

हुबळी – आगामी  लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. यातच सर्व पक्षीय नेते विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल प्रचार दौऱ्यावेळी शाब्दिक टीका करत आहे. अशातच भाजप पक्षातील कर्नाटकचे आमदार बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची खिल्ली उडवली असून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

दरम्यान, एका नामांकित वृत्तसंस्थेने भाजप पक्षातील कर्नाटकचे आमदार बसवराज बोम्मई यांना लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विरोधी पक्षाबाबत प्रश्न विचारले असता ते म्हंटले, ‘राहुल गांधी आणि कुमारस्वामी ज्या पद्धतीने बोलतात, वागतात आणि वेगवेगळ्या देहबोलीवरून ते दुसऱ्यांच्या गंमतीचा विषय होत आहे. त्यामुळे आता जनताच ठरवेल ‘हिरो कोण आणि जोकर’ कोण असेल ते, कर्नाटक मध्ये काँग्रेस लिंगायत समाजाला फक्त वापरत आहे, असा गंभीर आरोप बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर केला.

Rahul Gandhi, Kumaraswamy are ‘jokers’, says BJP’s Basavaraj Bommai

Read @ANI Story| https://t.co/BuyycZxxH3 pic.twitter.com/exmNiyAx5Q

— ANI Digital (@ani_digital) April 19, 2019

Leave A Reply

Your email address will not be published.