मुंबई- मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व कालाकारांना एकाच छताखाली एकत्र आणणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या दिमाखदार सोहळ्याच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरील अनेक तारेतारका ‘रेड कार्पेट’वर अवतरलेल्या पाहायला मिळाल्या.
दरम्यान, यावेळी वैदेही परशुरामी, सिद्धार्थ जाधव, पल्लवी पाटील, शिवानी सुर्वे, मानसी नाईक आणि अंकुश चौधरी अशा अनेकांनी नृत्य सादर करून आपली वेगळी छाप पाडली.
यंदाच्या वर्षातला ‘खारी बिस्कीट’ हाचित्रपट, सर्वाधिक पुरस्कार मिळवण्यात यशस्वी चित्रपट ठरला. चार पुरस्कार आपल्या नावावर करत, ‘खारी बिस्कीट’ने आपला ठसा उमटवला.
संजय जाधव यांनी ‘फेवरेट दिग्दर्शक’ हा पुरस्कार मिळवला, तर अमितराज यांच्या ‘तुला जपणार आहे’ या गीताला फेवरेट गीत म्हणून निवडण्यात आलं.
या दिमाखदार सोहळ्यात अभिनेता वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांच्या जोरदार सूत्रसंचालनाने सोहळ्याची रंगत वाढवली.