हिंदी सिनेमा इंडिस्ट्रीतील कॅामेडीचा बादशाह म्हणून गोविंदाला ओळखले जाते. त्याची पत्नी सुनीता अहूजा हि तिच्या स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते. असे तिने आजवर दिलेल्या अनेक मुलाखती दरम्यान दिसून आले आहे. आता सुनीता हिने एका यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीवेळी तिच्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीविषयी सांगतिलं आहे. यामुळे चाहत्यांसाठी सुनीताने सांगितलेला बड्डेचा स्पेशल डे आता चर्चेला विषय बनला आहे. कर्ली टेल्स म्हणजेच कामिया जानीने सुनीताची मुलाखत घेतली, त्यावेळी सुनिताने तिच्या वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीविषयी सांगितलं आहे.
या मुलाखतीवेळी सुनीताने आपले ड्रिंक्सवर प्रेम असल्याचे सांगितले. तसेच वाढदिवसाची अनोखी पद्धती देखील यावेळी सांगितली. माझ्या घरातील बार काउंटर हे माझं सर्वात आवडतीचं ठिकाण आहे. या ठिकाणी मी माझ्या आवडत्या ड्रिंकसोबत एन्जॉय करते. जेव्हा मी आनंदी असते तेव्हा मला ड्रिंक करायला खूप आवडते, असा खुलासा सुनीताने केला आहे. तसेच जसं की माझ्या मुलांच्या वाढदिवसादिवशी तसेच भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पाहताना ड्रिंक्स एन्जॉय करते. मात्र, मी दररोज ड्रिंक करत नाही, फक्त रविवारी मी ड्रिंक्स एन्जॉय करत असल्याचे स्पष्टीकरण सुनीता अहुजाने दिले आहे.
‘त्या’ दिवशी एकटीच….
अनेकांना आपला वाढदिवस मित्र मैत्रिंणीसोबत साजरा करायला आवडतो. मात्र, गेल्या 12 वर्षांपासून सुनीता हा तिचा वाढदिवस एकटीच साजरी करत आहे. सुनीता तिच्या वाढदिवसादिवशी सकाळी मंदिरात किंवा गुरुद्वारामध्ये जाते आणि प्रार्थना करते. त्यानंतर घड्याळात रात्रीचे 8 वाजल्यानंतर ती वाईनची बाटली उघडते, केक कापते आणि एकटीच वाढदिवस साजरा करते, असा खुलासा तिने या मुलाखतीवेळी केला आहे. तिच्या या खुलाशाने अनेकांच्या भुवय्या उंचवाल्या आहेत.