चंदीगड – पंजाबमध्ये आज भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार झाली आहे. मान मंत्रिमंडळातील दहा मंत्र्यांनी आज शपथ घेतली. शुक्रवारी रात्रीच मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यापैकी एक म्हणजे लालचंद कटारुचक यांना आज मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
51 वर्षीय लाल चंद नुकत्यांच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भोआ मतदारसंघातून विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, लालचंद हे व्यावसायाने सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचं शिक्षण 10वीपर्यंत झालं आहे.
लाल चंद यांनी 2017 मध्ये भोवा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती पण त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. लालचंद हे भारतीय रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट ऑफ इंडियाचे सदस्य होते. याच पक्षाकडून त्यांनी 2017 मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना स्वबळावर १३ हजार ३५३ मते मिळाली होती.
दरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लालचंद यांनी त्यांची एकूण संपत्ती ६.२ लाख रुपये असल्याचं सांगितलं आहे. मात्र त्यांची स्थावर मालमत्ता शून्य आहे. लालचंद यांच्यावर आतापर्यंत एकही फौजदारी गुन्हा दाखल नाही.