-->

शेतकऱ्यांचे माथी भडकवणार दीप सिद्धू आहे तरी कोण ? मोदींसोबतचा फोटोही व्हायरल

नवी दिल्ली – कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या धरून बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले.  अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या हिंसाचाराला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू जबाबदार असल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष गुरनाम सिंह चढूनी यांनी केला आहे.

गुरनाम सिंह चढूनी यांनी दीप सिद्धूपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दीप सिद्धू आंदोलनाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत होता. दीप सिद्धू नेहमीच शेतकरी नेत्याविरुद्ध वक्तव्य करतो. शेतकऱ्यांची दिशाभूल करतो.  असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.  सध्या दीप सिद्धू चांगलाच चर्चेत असून सोशलवर नेमका तो आहे तरी कोण असे प्रश्न उपस्थित केले जात.

तसेच,  वर्ष 2019 मध्ये अभिनेता सनी देओलने जेव्हा गुरुदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा आपल्या प्रचाराच्या टीममध्ये दीप सिद्धू याला सोबत ठेवले होते. त्यांचे सोशलवर त्यावेळेच्या प्रचारा दरम्यानचे फोटो सुद्धा  सोशलवर व्हायरल होत असून या प्रकरणाला आता वेगळे वळण आल्याचे दिसून येत आहे.

कोण आहे दीप सिद्धू ?

  • दीप सिद्धू  पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. १९८४ मध्ये पंजाबमधील मुख्तसार जिल्ह्यात त्याचा जन्म झाला. त्याने कायद्याची पदवी घेतली.

– किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही राहिला आहे. २०१५ मध्ये दीप सिद्धूचा रमता जोगी हा पहिला सिनेमा पदर्शित झाला. जोरा दस नबरिया या सिनेमानं त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणलं. 

– भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत दीप सिद्धू होता. लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर मात्र सनी देओल यांनी ट्विट करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूशी कोणताही संबंध नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे, असं देओल यांनी म्हटलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.