मुंबई – निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिने नुकताच साखरपुड्याचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लेक आलिया कश्यपला तिचा प्रियकर शेन ग्रेगोयरने लग्नासाठी प्रपोज केले आहे. आलिया 22 वर्षांची आहे आणि आयुष्याच्या नव्या सुरुवातीबद्दल खूप उत्साहित आहे.
20 मे रोजी चाहत्यांना आनंदाची बातमी देताना आलियाने सांगितले की, तिचा प्रियकर शेनने तिला लग्नासाठी प्रपोज केले आहे. तिने लाखो किमतीची हिऱ्याची मोठी अंगठी घातली आहे.
लवकरच दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. यासोबतच आलियाने तिच्या मंगेतरसोबतचा एक लिपलॉक फोटोही शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इंडोनेशियाच्या बाली शहरात दोघांनी एकमेकांना होकार देत लवकरच लग्न होणार असल्याचे सांगितले आहे. अनुराग कश्यपचा होणारा जावई शेन ग्रेगॉइर हा 23 वर्षांचा आहे. तो अमेरिकन उद्योजक आहे. रॉकेट पॉवर्ड साऊंड या नावाच्या कंपनीचा तो संस्थापक आहे. ही एक सॉफ्टवेअर कंपनी आहे जी साऊंड डिझाइनिंग आणि म्युझिक प्रॉडक्शन स्किल डेव्हलपमेंट करते.