मतदान टक्का वाढल्याचा फटका कुणाला?; वाचा मतदानाची टक्केवारी

  • पुणे विभाग शिक्षकसाठी 70.44, पदवीधरसाठी 50.30 टक्के मतदान

 

पुणे – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले. करोनाच्या संकटामुळे किती मतदार मतदानासाठी बाहेर पडतील याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी असल्याने या निवडणुकीमध्ये दोन्ही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.

 

 

यंदा मात्र पुणे विभागात पदवीधरसाठी 50.30 टक्के आणि शिक्षकसाठी 70.44 टक्के मतदान झाले. तर 2014 मध्येच पुणे जिल्ह्यात पदवीधरसाठी सुमारे 17 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 टक्के मतदान झाले होते. यंदा पुणे जिल्ह्यातही मतदानाची टक्केवारी वाढली असून पुणे जिल्ह्यात पदवीधरसाठी सुमारे 45 टक्के तर शिक्षक मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले.

 

 

शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात होते. पुणे विभागातील एकूण 1 हजार 202 मतदान केंद्रांवर मतदान झाले. पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदार तर शिक्षक मतदारसंघासाठी 72 हजार 545 मतदार होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. पहिल्या दोन तासांत पुणे विभागात पदवीधरसाठी 36 हजार 313 मतदारांनी तर शिक्षक मतदारसंघासाठी 8 हजार 252 मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात पदवीधरसाठी 7 टक्के म्हणजे 9 हजार 563 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर शिक्षक मतदारसंघासाठी 8.10 टक्के म्हणजे 2 हजार 608 मतदारांनी मतदान केले. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत मतदानामध्ये काहीसी वाढ झाली.

 

 

विभागात पदवीधरसाठी 19.44 टक्के म्हणजे 82 हजार 877 मतदारांनी मतदान केले. तर शिक्षक मतदारसंघासाठी 26.25 टक्के म्हणजे 19 हजार 45 मतदारांनी मतदान केले. पुणे जिल्ह्यात 12 वाजेपर्यंत पदवीधरसाठी 10.80 टक्के म्हणजे 14 हजार 753 तर शिक्षक मतदारसंघासाठी 4 हजार 218 मतदारांनी मतदान केले. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. दुपारी 12 ते 2 पर्यंत विभागात पदवीधरसाठी 37.10 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 54.03 टक्के मतदान झाले.

 

दुपारी 2 ते सायंकाळी 4 पर्यंत पुणे विभागात पदवीधरसाठी 49.52 टक्के म्हणजे 2 लाख 11 हजार मतदारांनी मतदान केले. तर शिक्षक मतदारसंघासाठी 67.36 टक्के म्हणजे 48 हजार 869 मतदान झाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.