ब्रिटन – लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावं लागतं. कधी काय दुर्घटना होईल, याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. अनेकदा काही दुर्घटना जीवघेण्या ठरू शकतात. अशीच काहीशी घटना चिमुकलीसोबत झालं आहे. इंग्लंडच्या सर्रेतील ही धक्कादायक घटना घडली आहे.
एक चिमुरडी आपल्या वडील आणि भावासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर घोड्याने लाथ मारली. यामुळं तिची अवस्था भयंकर झाली आहे. ही चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देतेय.
या चिमुरडीचं नाव मॅडिसन आहे. मॅडिसन आपल्या वडिलांसोबत शेतात फिरायला गेली होती. तिथं मोठ्या प्रमाणात घोडे होते. या घोड्यांजवळ ती फिरत होती. यावेळी एका घोड्याने अचानक मेडिसनच्या चेहऱ्यावर लाथ मारली. घोड्याने मारलेली लाथ एवढी जोरात होती की, मॅडिसनचा एक डोळा अक्षरश: बाहेर आला होता.
मॅडिसनचे वडील त्यांच्या दुसऱ्याला पाहात होते. त्याचवेळी ही घटना घडली. मॅडिसन आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मेडिसन लवकर बरी होईल, अशी आशा तिच्या पालकांना आहे.