निमसागरला कुणी डॉक्‍टर देता का हो?

उपकेंद्रातील स्थिती ः निमजाईमाळ व झोपडपट्टीभागात चिकनगुनियाचा प्रादुर्भाव

निमसाखर- निमसाखर (ता. इंदापूर ) येथील निमजाईमाळ व झोपडपट्टीभागात गेल्या काही महिन्यांपासून चिकनगुनिया सदृश्‍य अन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची टीम काम करत असली तरी दुसरीकडे निमसाखर प्राथमिक उपकेंद्रात डॉक्‍टरच उपलब्ध होत नसल्याने डॉक्‍टर कुणी देता का? अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे

निमसाखर हे 6 हजार लोकसंख्या व सहा ते सात लहान-मोठ्या वाड्या-वस्त्या असलेले गाव आहे. यामधील निमजाईमाळ व झोपडपट्टी परिसरांमध्ये चिकनगुनिया, मलेरिया, जंतू संसर्गासह अन्य आजारांनी परिसराला विळाखा घातला आहे. या परिसरातील घरोघरी एक-दोन आजारांची लागण झालेले रुग्ण मिळत आहेच, पण काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबच आजारी पडत आहे. या परिसरात अस्वच्छता साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीकडून या परिसराची स्वच्छता करून योग्य ती दक्षता घेतली जात आहे. याच बरोबर परिसरात फॉगिंग मशीनच्या माध्यमातून धुरळणीचे कामही वेगात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आणि आशवर्करसह आरोग्यसेविका यांच्या माध्यमातून निरवांगी येथील उपकेंद्रातील डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणीचे काम वेगात सुरू आहे.

  • डॉक्‍टर का उपलब्ध होत नाहीत?
    निमसाखर जिल्हा परिषदेच्या उपकेंद्रामध्ये अनेक कर्मचाऱ्यांपैकी महत्त्वाचे डॉक्‍टर नसल्याने सध्या या परिसरातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा अडचणी येत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी निमसाखर आरोग्य केंद्रांमध्ये
    डॉक्‍टरांची गरज असताना डॉक्‍टर का उपलब्ध होत नाहीत? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
    या निमसाखर उपकेंद्रात डॉक्‍टरांचे नियुक्ती आहे की नाही हेच समजेनासे झाल्याने आरोग्य विभागाने याचा खुलासा करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
  • डॉक्‍टरांची नियुक्ती केलेली असून केंद्रामध्ये डॉक्‍टरांना थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. निमसाखर परिसरात 72 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी सर्व्हे केला जात असून 14 चिकनगुणिया सदृश्‍य रुग्न आढळले आहेत.
    डॉ. प्रशांत महाजन, वैद्यकीय अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.