सध्या लॉकडाउनमुळे अभिनेता सलमान खान पनवेल येथील फार्महाउसवर अडकला आहे. सलमानने त्याच्या मित्रमंडळींसोबत लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा वापर करत काही गाणी बनवून, गाऊन, शूट करून रिलीज करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यापैकी हे एक गाणं तेरे बिना!
या गाण्यामुळे सलमान आणि त्याच्यासोबत झळकलेली जॅकलिन फर्नांडिस दोघेही चर्चेत आहेत. पण सर्वाधिक चर्चा होतेय ती या गाण्यात सलमान खानसोबत ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणा-या एका चिमुरडीची. ती बालकलाकार नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा आहे. सियैना ही सलमानची चांगली मैत्रीण आणि अभिनेत्री वलुचा डिसूझा हिची लहान मुलगी आहे.
दरम्यान, तेरे बिना गाण्याच्या रोमॅन्टिक व्हीडिओमध्ये सलमान सोबत केवळ जॅकलिन फर्नांडीसची झलक पहायला मिळते. यामध्ये दोघांची घोडेस्वारी, बाईक राईड, स्विमिंग पूलमधील डूबकी ते अगदी मावळत्या सूर्याच्या साक्षीने घट्ट मिठी अशा वेगावेगळ्या मूडसची झलक पहायला मिळते. तेरे बिना हे गाणं सलमान खानने स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केले आहे.