पुरस्कार नेमका कोणाला? नव्या की जुन्या शुभ्राला? मंचावरच उडाला गोंधळ…

झी मराठी पुरस्करसोहळ्यात गोंधळ...

मुंबई- सध्या मराठी मालिकांमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात आहे. त्यात सामाजिक विषयांचं भान राखून सहज सोप्या पद्धतीने विषयांची मांडणी होताना दिसते आहे. पुर्वीच्या मालिक सासू-सुनेच्या वादासाठी प्रसिद्ध होत्या. मात्र जसा काळ बदलला तसे प्रेक्षकही बदलले. त्यामुळे आता अनेक नवीन मालिकांमध्ये सासू- सुनेच्या मैत्रीचे नाते दिसून येते.

झी मराठी वाहिनीवरील बहुचर्चित ‘अगं बाई सासू बाई’ ही मालिका थोड्या काळात प्रचंड लोकप्रिय झाली. मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात प्रेक्षक अजूनही आहेत. अश्यात या मालिकेच्या जागी ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु झाली. प्रेक्षकांनी या नव्या कोऱ्या मालिकेला देखील उदंड प्रतिसाद दिला.

दरम्यान, नुकतंच या बहुचर्चित मालिकेला झी मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका आणि कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कारानं देऊन सन्मानित करण्यात येत. हा पुरस्कार सोहळा इतर सोहळ्यांप्रमाणेच सामान्य वाटत असला, तरी यामध्ये घडलेल्या एका अनोख्या घटनेनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. झी मराठी तर्फे यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट सुने’चा पुरस्कार शुभ्रा या व्यक्तिरेखेला मिळाला. खरं तर हा पुरस्कार अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला घोषित केला गेला. परंतु हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नवी शुभ्रा अर्थात अभिनेत्री उमा पेंढारकर मंचावर गेली होती. त्यामुळं सध्या एकच गोंधळ माजला आहे. नक्की हा पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला.

मात्र, अभिनेत्री उमा पेंढारकर हिने हा उलगडा मोकळा करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. उमा आपल्या इंस्टास्टोरीमध्ये या पुरस्कारासंदर्भात म्हणती की.., “काल तेजश्री प्रधान ताईच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारताना मला खूप आनंद झाला होता. तुला मनापासून शुभेच्छा..! तुझ्या इतक्याच ऊर्जेने ते पात्र साकारायला मी उत्सुक आहे.’ असं ती म्हणाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.