तेलुगू सुपरस्टार प्रभासची फॅन फॉलोइंग केवळ भारतच नव्हे तर जगभरात आहे.यात अमरेंद्र बाहुबली म्हणजे प्रभासच्या अभिनय सर्वानाच वेड लागले होते. तसेच या चित्रपटातील नकारात्मक मनात विषाचं बीज पेरल्याने अहंकारी आणि मग्रुर झालेला कालकेय हा नक्की आहे तरी कोण? तो कोणती भाषा बोलतो? याबद्दल प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते.
मुख्य भूमिकांसोबतच या सिनेमातील खलनायकाची म्हणजे कालकेयची भूमिकाही प्रचंड गाजली. आधीच्या बाहुबलीमधील कालकेय ‘बाहुबली २’ मध्ये दिसला नाही. असे असले तरीही कालकेय ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे . ‘बाहुबली’मध्ये कालकेयची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव प्रभाकर
दरम्यान, प्रभाकर हा तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहतो. ‘बाहुबली’मध्ये भलेही आपण त्याला भयंकर अवतारात पाहिले असले तरी खऱ्या आयुष्यात तो खूपच लाजरा आहे. प्रभाकर आज जे काही आहे त्याचं सारं श्रेय तो एसएस राजमौली यांना देतो.
‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.