मुंबई – राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या क्षमतांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा अनुभव नसतानाही त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यात आल्याची टीका भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे.
अशातच आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. यासोबतच त्यांनी, “पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर?” असा खोचक प्रश्नही उपस्थित केलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करताना हिंदी व मराठी भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिंदी व मराठी भाषा एकत्रित वापरल्याने निलेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
निलेश राणे यांनी याबाबत ट्विट करताना, ‘मराठी हिंदी मिक्स भाषण… भाषेचं सोडा ह्या मुख्यमंत्र्यांना काहीच धड येत नाही. पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही, तुम्हाला ही पश्चाताप होत असेल. लोकं राहुल गांधीला विसरले जेव्हापासून पवारसाहेबांनी हे कॅरॅक्टर बाहेर काढलं.’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या त्या भाषणाची खिल्ली उडवली आहे.
मराठी हिंदी मिक्स भाषण… भाषेचं सोडा ह्या मुख्यमंत्र्याला काहीच धड येत नाही. पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही, तुम्हाला ही पशाताप होत असेल. लोकं राहुल गांधीला विसरले जेव्हापासून पवारसाहेबांनी हा character बाहेर काढला. pic.twitter.com/t5BzGwRP8b
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 23, 2020