Sayaji Shinde : AIMIM च्या नगरसेविका सहर शेख यांच्या एका विधानाने वादाला तोंड फुटले आहे. मुंब्रा येथील जाहीर सभेतून सहर शेख यांनी पुढच्या पाच वर्षात ‘मुंब्रा हिरवा करू ‘ असे वादग्रत विधान केले होते. तसेच सहर यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. ‘कैसा हराया’ असे त्या म्हणाल्या होत्या. या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले आहेत. सहर शेख यांनी केलेल्या विधानमुळे वाद निर्माण झाला असून, सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला जात आहे. यात कमी काय म्हणून AIMIM पक्षाचे नेते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र हिरवा करू असे विधान करून वाद आणखी चिघळवला. यानंतर राज्यात रंगावरून राजकारण तापले असतानाच आता मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी भाष्य केले आहे. ‘कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही’ असे सयाजी शिंदे म्हणाले आहेत. हेही वाचा : Winter Storm in America : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा ; आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू, अनेक राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर एमआयएमच्या नगरसेविकेच्या ‘मुंब्रा हिरवा करू ‘ या वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेते सयाजी यांनी आपली प्रितिक्रिया दिली. “कुठलाही रंग कोणाच्या बापाचा नाही. सगळे रंग निसर्गाच्या बापाचे आहेत. निसर्ग आपलं मूळ आहे. त्याच्यामध्ये सगळे रंग आहेत. कोणाला आव आणून असं करता येत नाही. हे रंग आतून येतात आणि ते फक्त झाडांमधून येतात” अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी दिली. सहर यांच्या मुंब्रा हिरवा करू या विधानानंतर जलील यांनी महाराष्ट्र हिरवा करू असे विधान केल्याने वाद आणखी चिघळला. सहर शेख यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. चहूबाजूने टीका झाल्यानंतर सहर शेख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असे त्या म्हणाल्या. “आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असला असता तर त्या रंगाचा म्हणाले असते, ” असे स्पष्टीकरण सहर शेख यांनी सुरु असलेल्या वादावर दिले. हेही वाचा : Health Tips: उठताच चक्कर येणे म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय