Tanaji Sawant Son Rushiraj Sawant | माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचं 10 फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु ऋषीराज सावंतसोबत ते दोन मित्र कोण होते, त्यांची नावे आता समोर आली आहे. प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र ऋषीराज यांच्यासोबत खाजगी विमानात होते. Tanaji Sawant Son Rushiraj Sawant |
काय होते प्रकरण?
तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केले. चारच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन गेले आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाले. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेल्याची माहिती मिळाली.
मात्र ऋषीराज सावंत हा त्याच्या दोन मित्रांसोबत बँकोकला निघाला होता. एका खाजगी विमानाने संध्याकाळी साडेचार वाजता बँकॉकच्या दिशेने ठेवलं प्रस्थान केलं होतं. एका खाजगी कंपनीचे विमान भाड्याने घेऊन बँकॉकचे बुकिंग केलं होतं. एका खाजगी गाडीने पुणे विमानतळ गाठत तिथून बँकॉकला जाण्याचा प्लॅन केला होता. ड्रायव्हरने यासंदर्भातील सर्व माहिती त्याने ऋषिराज यांच्या घरच्यांना कळवली. त्यानंतर ऋषीराज सावंतच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासांनंतर तानाजी सावंत पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती दिली.
तानाजी सावंत आणि ऋषीराज यांच्यात कित्येकदा संवाद होत होता. मात्र आज दिवसभरात त्याचा आणि सावंत यांचं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नव्हतं. त्यामुळे या सर्व प्रकारामुळे काळजी लागली असल्याचेही तानजी सावंत यांनी सांगितले होते. दरम्यान, सावंतांचा मुलगा बँकॉकला का चालला होता? तसेच त्याच्यासोबत असलेले हे मित्र कोण होते? याचे सविस्तर तपास पोलीस करत आहेत. Tanaji Sawant Son Rushiraj Sawant |
हेही वाचा :