Sanjay Raut : नाशिकमधील भोंदू बाबा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी मोठी मागणी करत काही सवाल उपस्थित केले आहेत.Sanjay Raut नाशिकमधील भोंदू अशोक खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधील ‘ते’ बडे नेते कोण? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केला आहे, त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावे जाहीर करण्यात यावीत, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होता हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. फडणवीसांनी त्यावर बोलावे, असे देखील राऊत म्हणाले आहेत. Sanjay Raut Sanjay Raut : भोंदू अशोक खरातांकडे जाणारे ‘ते’ 40 आमदार कोण? संजय राऊतांच्या सवालाने खळबळ पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल, असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले. Sanjay Raut अशोक खरातसोबत शिवसेना नेते मंत्री दीपक केसरकर यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यांच्यावर देखील विरोधकांनी आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला घेऊन खरातला राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता का? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना दीपक केसरांचे नाव घेत त्यांनी केलेल्या विधानावर विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे अशी मागणी केली आहे. संजय राऊत म्हणाले, सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. 29 मार्चला पोलीस कोठडीची मुदत संपणार त्यामुळे या प्रकरणात अशोक खरातसोबत राजकीय नेत्यांचे लागेबांधे होते का? हा महत्वाचा प्रश्न विचारला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास एसआयटी करत असून, उद्या 29 मार्चला अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत संपत आहे. त्यामुळे उद्या कोर्टात काय घडते याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात; ‘मंजुळा’ गाण्यातील बोल्ड लुक समोर