व्हिडियो कॉल सुरू असतानाच या राजकीय नेत्याची पत्नी आली नग्नावस्थेत, सोशलवर व्हिडियो तुफान व्हायरल 

नवी दिल्ली  – करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या ऑनलाइन मिटींगचा जास्त प्रमाणात वापर केला जात आहे. फेसबुक लाईव्ह, व्हिडियो कॉन्फरन्स कॉल यांचा वापर करत सर्व जन एकमेकानांशी संवाद साधला. मात्र या ऑनलाईन मिटींग्सवेळी अनेकदा कॅमेरा पुढे असे काही घडते की त्यामुळे त्यांची चर्चा सोशलवर चांगलीच होत असते.

अशाच एक प्रकार दक्षिण आफ्रिकेत घडला आहे. एका मोठ्या नेत्याची बायको झूम मीटिंगमध्ये नग्नावस्थेत कॅमेरा समोर दिसल्याने एकच खळबळ उडाली. दक्षिण आफ्रिकेचे संसदीय समितीचे सदस्य केपटाउनमधील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यासंदर्भात कशाप्रकारे मदतकार्य सुरू आहे, याची माहिती देत होते. त्याच वेळेला त्यांची पत्नी बाथरूममधून आंघोळ करून नग्नावस्थेत कॅमेरासमोर दिसल्याने एकच खळबळ माजली.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. समितीच्या प्रमुखांनी या सदस्याला चालू मीटिंगमध्येच खडेबोल सुनावले आणि हा काही तुमचा पहिला प्रसंग नाही, या आधीही अशा घटना घडल्या असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. यावर त्यांनी आपली बाजू मानली असून म्हंटले आहे की,’ माझं घर छोटं असल्यामुळे वेगळ्या रूमचीही व्यवस्था नसल्याने हा सगळा प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. 10 वाजता संपणारी बैठक 10 वाजल्यानंतरही सुरू होती आणि माझी बायको बाथरूममधून आली तेव्हा ऑनलाईन मीटिंग सुरू आहे याची तिला थोडीशीही कल्पना नसल्याने हा सर्व प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.