आंदोलक रुळावर असतानाच सुपरफास्ट रेल्वे आली अन्; झालं असं काही कि…

औंरंगाबाद – कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असून देशभरात आज ‘रेल्वे रोको’ची हाक देण्यात आली आहे. याला पाठिंबा देण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. अशातच औरंगाबाद येथे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

औरंगाबादेत कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनासाठी लासूर स्थानकाजवळ जमा झाले होते. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले. परंतु,  त्याचवेळी समोरून भरधाव वेगात एक्स्प्रेस आली होती. या गाडीला लासूर स्थानकावर थांबा नव्हता.

समोरून रेल्वे येत असतानाही कार्यकर्ते ट्रॅकवरून बाजूला हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरून बाजूला खेचले. त्यामुळे कार्यकर्ते अवघ्या काही सेंकदाने बचावले आहेत.  यामुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरात रेल्वे रोको आंदोलन सुरु आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व देशभरात रेल्वे स्थानकावर पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.