नवी दिल्ली: देशात आज काँग्रेसचा ‘स्थापना दिवस’ साजरा करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी पक्षाच्या स्थापना दिवसाच्या पूर्वसंध्येलाच परदेशात रवाना झाले आहेत. त्यांच्या या परदेश दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
देश हित की आवाज़ उठाने के लिए कांग्रेस शुरू से प्रतिबद्ध रही है।
आज कांग्रेस के स्थापना दिवस पर, हम सच्चाई और समानता के अपने इस संकल्प को दोहराते हैं।
जय हिंद!#CongressFoundationDay pic.twitter.com/LCJvcABYh1
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 28, 2020
राहुल गांधी वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, हे पक्षाकडून अद्याप सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे आज काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्याच्या काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते, राहुल गांधी हे काही दिवसांसाठी बाहेर असणार आहेत. तसेच राहुल गांधी हे ‘शॉर्ट पर्सनल व्हिजिट’साठी विदेशात रवाना झाले आहेत. ते काही दिवसांसाठी बाहेर राहतील. परंतु, त्यांनी राहुल गांधी हे कुठे गेले आहेत, याची माहिती दिली नाही.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी कतार एअरवेजच्या फ्लाइटने इटलीतील मिलानसाठी रवाना झाले आहेत. त्यांची आजी इटलीत राहते आणि त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी यापूर्वीही तिथे गेले आहेत.
विशेष म्हणजे सोमवारी काँग्रेसचा 136 वा स्थापना दिवस आहे. स्थापना दिवसानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले जाते. यावेळी गांधी कुटुंबीयांसमवेत काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित असतात.