बजेट मांडताना सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले

मुंबई : महानगरपालिकेचा  आज वर्षाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात येत आहे.  यावेळी  अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात झाल्यावर या थोडा गोंधळ झाला. कारण असे की अर्थसंकल्पात शिक्षण मंडळाचं बजेट मांडत असताना महापालिका सहआयुक्त रमेश पवार हे पाणी समजून सॅनिटायझर प्यायले.

मिळालेल्या माहितीनुसार, हापालिका सहआयुक्त रमेश पवार  यांनी शिक्षण बजेट मांडलं जात असताना पाण्याची बाटली समजून सॅनिटायझरची बाटली उचलली आणि प्यायले.  हे वेळेत लक्षात आल्यामुळे  ते तेथून त्वरित बाहेर पडले आणि त्यानंतर पुन्हा येऊन कामकाजात सहभागी झाले.

नुकतंच नागपूर आणि यवतमाळ मध्येसुद्धा  असा काहीसा प्रकार घडला आहे. नागपुरातील एक व्यक्तीने दारू न मिळाल्याने  सॅनिटायझर प्यायले. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.