श्रीनगर – जम्मू कश्मीरचे फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष सय्यद अली शाह गिलानी यांचे श्रीनगर येथील राहत्या घरी निधन झाले. गिलानी बराच दिवसांपासून आजारी होते.
याबाबत जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या. यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले आहे मात्र त्यांचा या ट्विटवर आता टीका होतांना दिसून येत आहे.
इम्रान खान यांनी ट्विट केले आहे की,’काश्मिरी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख झालं. गिलानी यांनी नेहमी काश्मिरी लोकांना त्यांचा हक्कासाठी लढायला शिकवले. आम्ही पाकिस्तानमध्ये त्यांच्या संघर्षाला सलाम करतो.’
ते पुढे म्हणाले,’त्यांच्याच शब्दात त्यांची आठवण काढायची झाल्यास, आम्ही पाकिस्तानी आहोत आणि पाकिस्तान आमचा आहे. पाकिस्तानचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला असून एक दिवस राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात येत आहे.’त्यांनी वापरलेल्या भाषा आता टीकेचा विषय ठरत आहे.