नवी दिल्ली : ऑनलाइन जेवण मागवणे महाग झाले आहे. कंपन्यांनी ऑनलाइन जेवणावर सूट देणे बंद केले आहे, तर डिलिव्हरी शुल्कात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. फूड डिलिव्हरी अॅप्स झोमॅटो आणि स्विगीचा विक्रीवरही परिणाम झाला आहे. आता ऑर्डर रद्द करण्यासाठी कंपन्यांनीही पैसे आकारण्यास सुरवात केली आहे.
ग्राहकांना केवळ निवडक रेस्टॉरंट्सवर सूट मिळत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, ऑक्टोबरपासून जोमाटो आणि स्विगीशी जोडलेल्या रेस्टॉरंट्सच्या विक्रीत पाच ते सहा टक्क्यांनी घट झाली आहे. झोमॅटोने अलीकडेच वेळेवर नि: शुल्क वितरण करण्याची सुविधा देखील सुरु केली आहे. यासाठी ग्राहकांना अतिरिक्त दहा रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या ग्राहकाला वेळेत जेवण मिळालं नाही तर कंपनी त्याला विनामूल्य भोजन देईल.
झोमॅटो डिलिव्हरी शुल्क अंतरानुसार लागू केले आहे. झोमॅटो 16 ते 45 रुपयांपर्यंत डिलिव्हरी शुल्क आकारत आहे. स्विगीनेसुद्धा डिलिव्हरी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 98 रुपयांपर्यंतच्या डिलिव्हरीवर स्विगी 31 रुपये आणि त्यापेक्षा जास्त ऑर्डरवर 21 रुपये घेते आहे.