बारामती : आग विझवत असताना आपल्या हाताला चटके बसणारच अशा शब्दात नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांनी तारांगण कोविड केअर सेंटर येथे कार्यरत असलेल्या कोरोणा योध्याप्रति आपल्या भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ हे गेली एक वर्षापासून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोणा योद्धा म्हणून कार्यरत आहेत. सध्या तारांगण को विड केअर सेंटरच्या माध्यमातून ते रुग्णांना सेवा देत आहेत. असे असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी व आठ महिन्यांची लहान मुलगी तसेच अकरा वर्षांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाला.
त्यांच्यावर तारांगण कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू झाले. कुरोणा योद्धाच्या परिवारावर कोरोनाचे संकट कोसळल्याने नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी कोरोना योद्धा किशोर मासाळ व त्यांच्या परिवाराची तारांगण कोविड केअर सेंटर येथे भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना आधार दिला.आग विझवत असताना आपल्या हाताला चटके बसणारच अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.तसेच लहान चिमुरडीवर उपचार करणारे डाॅ, सनी मुथा, डॉ अमित कोकरे ,डॉ अश्विनकुमार वाघमोडे , डॉ विश्वनाथ नरुटे , डॉ नम्रता शिंगाडे सर्वं नर्स मावशी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी त्यांनी आभार मानले.
बारामती शहरात करोणाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेले एक वर्षापासून मी कोरोणा योद्धा म्हणून कार्यरत आहे. रुग्णसेवा देत असतानाच कोरोना माझ्या घरापर्यंत पोहोचला. पत्नी तसेच आठ महिन्यांची लहान मुलगी व मुलाला कोरोणाची बाधा झाली. लवकर निदान झाल्याने त्यांच्यावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार झाले. उद्या त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. कोरणाची लक्षणे जाणवल्यास तात्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
– किशोर मासाळ प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस