तलवारीने बर्थडेचा केक ‘तो’ कापत होता अन् झालं असं काही की….

खामगाव (जि. बुलडाणा) : मित्रांसोबत वाढदिवस साजरा करताना, तलवारीने केक कापणे एका बर्थडे बॉयच्या चांगलेच महागात पडले आहे. तलवारीने केक कापणे आणि नाचगाणे सुरू असतानाच शहर पोलिसांनी एंट्री करत बर्थडे बॉयला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

स्थानिक बाळापूर फैलातील सुदर्शन गेटजवळ रात्री उशिरा वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. याआधारे शहर पोलीस घटनास्थळी धडकले असता, रोहन संजय बामनेट चार मित्रांसह वाढदिवस साजरा करताना दिसला.

पोलिसांना पाहून चौघांनी घटनास्थळावरून पळ काढला. रोहनला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्यासह चौघांविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५, भादंवि कलम १८८, २७९, २७०, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१(ब), साथरोग अधिनियम कलम ०३ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. चौघांचा कसून शोध घेतला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.