लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लखीमपूरच्या खिरी जिल्ह्यातून एका चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओत चिमुरड्याने उत्तरप्रदेशच्या आरोग्य विभागाची पोल खोल केली आहे. एका रुग्णाची अचानक बिघडल्यानंतर त्याला लखनऊला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला मात्र त्यानंतर लगेच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप एका ११ वर्षीय चिमुरड्याने केला आहे.
आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर छोट्या मुलाचा इमोशनल व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मुलाने,”अशी कोणती ट्रेन आहे जी १० मिनिटात लखनऊला पोहचवते? असा असा सवाल केला आहे. लाखिमपुरच्या खिरीमध्ये राहणाऱ्या रामचंद्र पांड्ये यांची गुरुवारी तब्बेत बिघडली होती.
त्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही काळानंतर त्यांची तब्बेत चांगली झाल्यानंतर त्यांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले. मात्र तिथे पुन्हा एकदा त्यांची तब्बेत बिघडली. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी कोणीही आले नाही. असा आरोप त्या चिमुरड्याने केलाआहे.
व्हिडिओमध्ये लहान मुलगा रडत वडिलांकडे केवळ १० मिनिट शिल्लक होते त्यावेळी त्यांना लखनऊला हलवण्यास सांगण्यात आले असल्याचे म्हणत आहे. तसेच अशी कोणती ट्रेन आहे जी १० मिनिटात लखनऊला पोहोचवणारी आहे असा सवाल त्याने केला आहे. तसेच त्याने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.