मोदी सरकारद्वारे देशाची ही कुठली चौकीदारी?

नवी दिल्ली – राफेल व्यवहाराच्या संबंधातील महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली असून याच कागदपत्रांच्या आधारे राफेल कराराला आव्हान दिले जात आहे असा दावा केंद्र सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती  ट्विटरद्वारे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मायावती यांनी ट्वीटद्वारे टीका केली आहे कि, ‘राफेल व्यवहाराच्या संबंधातील महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली. असा दावा आज केंद्र सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. सत्यानाश ! मोदी सरकारद्वारे देशाची ही कुठली चौकीदारी? देशहित आणि देशाची सुरक्षा खरोखरच मजबूत आहे का? विचार करावा लागेल.’

Leave A Reply

Your email address will not be published.