आपली बोलीभाषा इंप्रेसिव्ह असो किंवा नसो. मात्र, इंस्पायरिंग असली पाहिजे- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली –  नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये बुधवारी नेशनल यूथ पार्लियामेंट फेस्टिवल 2019 आयोजन करण्यात आले होते. या  फेस्टिवलमध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.  नरेंद्र मोदी यांनी युवांना संबोधित करताना म्हणाले कि, ‘ माझ्या समोर  सध्या न्यू इंडिया उपस्थित आहे. तरुणांची उर्जा नव्या भारताची ओखळ बनली आहे. आपल्या देशात आणि समाजात जर अशी युवा पिढी तयार होत असेल. तर समाजाचे अनेक मुद्दे योग्य पद्धतीने समजून आपले म्हणणे मांडण्याची भूमिका ही युवा पिढी  करु शकेल.’  तसेच आपल्या तोंडातून निघणारा शब्द, लोकांपर्यंत बाणासारखा गेला पाहिजे.  आपली बोलीभाषा इंप्रेसिव्ह असो किंवा नसो. मात्र, इंस्पायरिंग असली पाहिजे.’ तसेच, युवा संसदेसाठी अनेक कल्पना तुम्ही सूचवा. यासाठी विभागाच्यावतीने ऑनलाइनच्या माध्यमातून सूचना मागवण्याची व्यवस्था करा, असेही यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच या सोहळ्याला अनेक युवांसह केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड व अन्य मंडळी उपस्थित होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here