नवी दिल्ली : जगामध्ये करोनाला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग हा झपाट्याने वाढला आहे. त्यातही ज्या देशांमध्ये देशात करोना लसीकरणामध्ये जगात अव्वल असणाऱ्या देशांमध्ये भारत आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या पुढे केवळ अमेरिका आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे. भारतात 12 राज्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांपेक्षा अधिक लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. देशभरात 7 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 57,75,322 लाभार्थ्यांना लस मिळाली आहे. असे असले तरी लसीकरणावरून अनेकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक प्रश्न आहे.
त्यापैकीच एक म्हणजे करोना लस घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर काय करावे काय करून नये असे प्रश्न सध्या सर्च केले जात आहे. यातच लसीकरणाआधी आणि नंतर मद्यपान करायचे की नाही? असा प्रश्न सध्या गुगलवर जास्त प्रमाणात सर्च केला जातो आहे. अशा आशयाचे आशयाच्या प्रश्नांनावर तज्ज्ञांचे मत मांडले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे त्यानुसार…
–शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविडवरील लसीकरण झाल्यानंतर किमान २८ दिवसांपर्यंत मद्यपान करू नये.
-अल्कोहोल आणि कोरोनावरील लसीचा संयोग झाल्यास त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. परिणाम तीव्र होऊन रुग्णाला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे लस घेण्याआधी दोन दिवस आधी आणि नंतर २८ दिवसांपर्यंत मद्यपान करू नये.
-लसीकरणानंतर ३० दिवस आणि लसीकरणापूर्वी ४८ तास मद्यपान करू नयेत, असे संकेत आहेत. तरीही त्याचे पालन न केल्यास अंगदुखी, उलट्या होणे आणि प्रचंड थकवा जाणवतो. त्यामुळे कोविडवरील लस घेतल्यानंतर मद्यपान न करणे योग्य राहील.
-लसीकरणानंतर मद्यपान केल्यास प्रतिकारशक्ती कमी होते. अशी प्रतिकारशक्ती कमी झाल्यास लसीचा प्रभाव राहत नाही. कोरोना होऊ नये म्हणून मद्यपान करू नये. तसेच लसीकरणानंतरही करू नये, तर लसीचा चांगल्याप्रकारे परिणाम होऊ शकतो.