‘सत्ता असो-नसो, मनात आणले तर…’

खासदार बापट : नगरसेवक हरिदास चरवड आणि सहकाऱ्यांच्या कामाचे कौतुक

सिंहगड रोड – पैसा असो नसो, पद असो नसो, एकदा मनात आणले की, विकासकामे वेळेत होतातच. आपण काहीही करू शकतो हे मोठ्या कल्पकतेने आकारलेल्या क्रीडा मैदानाकडे पाहून लक्षात येते. याकामी पुढाकार घेणारे नगरसेवक हरिदास चरवड आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांचे कौतुक आहे. संपूर्ण पुणे शहरात टीमवर्क म्हणून सर्वात चांगले काम या प्रभागात होत असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

वडगाव बुद्रुक जाधवनगर येथे साकारण्यात आलेल्या कै. श्रीमती रुक्‍मिणीबाई विठ्ठलराव जाधव क्रीडा मैदानाच्या उद्‌घाटन प्रसंगी खासदार बापट बोलत होते. या मैदानावर महिलांसाठी स्वतंत्र दोन तास व्यायाम प्रकाराचे वर्ग विनामूल्य चालविण्यात यावेत. योगा हास्यक्‍लब खेळासाठी प्रशिक्षक नेमल्यास येथील वातावरण आरोग्यदायी राहील, येथे क्रीडा संस्कार रूजावेत, दर्जेदार खेळाडू येथे तयार व्हावेत, अशी अपेक्षाही बापट यांनी यावेळी व्यक्त केली .

या क्रीडा मैदानावर व्हॉलिबॉल, कबड्डी, बास्केटबॉल आदी खेळ खेळले जाऊ शकतात. तसेच, वाचनालय आणि खुली व्यायाम शाळाही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक संदेश जाधव, नगरसेविका निता दांगट, राजश्री नवले, अश्‍विनी पोकळे, पंचायत समितीच्या सभापती फूलाबाई कदम, स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे, खडकवासला भाजप अध्यक्ष अरुण राजवडे, सचिन मोरे, बाळासाहेब जाधव, अनंत दांगट, अविनाश चरवड, सागर भूमकर, बाळासाहेब पोरे, संजय पवळे, सिद्धेश पाटील, कल्पेश ओसवाल, संतोष परदेशी, चंद्रकांत पवळे, केदार जाधव, युवराज जाधव, रमेश मिटकरी, बाळासाहेब तुपकर, रामेश्‍वर चिखले, महापालिकेचे अभियंता सुरज पवार,आर्किटेक्‍ट कांबळे आदी मान्यवरांसह परिसरातील शेकडो खेळाडू, नागरिक उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.