कुठे भातलागवड, तर कुठे रोप जगविण्यासाठी धडपड

पवनानगर/नाणे मावळ  – जून महिनातील अखेरचे काही दिवस शिल्लक असताना मावळात पुरेसा पाऊस न झाल्याने भात रोपे संकटात सापडली आहेत, तर पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी भातलागवड सुरू केली आहे.

पवन मावळातील कोथुर्णे गावतील प्रगतशील शेतकरी विठ्ठल रावजी दळवी यांच्या शेतात भात लावणी करताना शेतकरी, तर एकीकडे भात लावणी लांबणीवर पडली आहे. जुनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनला सुरुवात होते; परंतु जून महिना संपला, तरी पावसाची चाहूल ही देखील अजून नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मॉन्सून लवकर दाखल होईल. त्यामुळे शेतकरी आनंदित होता, पण पाऊस न आल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती.

भातरोपेही चांगली आली आहे. पण पाण्याअभावी भातरोपे वायाजाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे, आठवड्याभरात पाऊस आला नाही, तर भातरोप वाया जाण्याची शक्‍यता आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताला पाणी दिले आहे. त्यांची भातरोपे आता लागवडही सुरू केली आहे. पावसाअभावी भात लावणी ही लांबणीवर पडली आहे, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस जरी शहरीभागात पडत असेल, तरी ग्रामीण भागात नुसता शिडकावाच करीत आहे. डोंगर भागात भातरोपे, तर पाण्याअभावी करपू
लागली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)