मोदींना इतके खोटे बोलण्याचे धाडस कोठून येते – तेजस्वी यादव

पाटणा – बिहारसाठी 33 हजार कोटी रूपयांच्या योजनांची सुरूवात केल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला पण त्याची राजद नेते तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडवली आहे. या योजनांची घोषणा म्हणजे सफेद झूट असून लोकांशी इतके खोटे बोलण्याचे धाडस त्यांच्यात कसे येते असा सवाल त्यांनी ट्‌विटरवर केला आहे.

पंतप्रधानांनी बिहार मध्ये एम्सच्या दर्जाचे आणखी एक रूग्णायल सुरू केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. बिहार मध्ये पहिले एम्स रूग्णालय युपीए सरकारच्या काळात सुरू झाले असून मोदी जे दुसरे एम्स रूग्णालय बांधणार आहेत ते कोठे असेल आणि ते केव्हा पुर्ण होईल याची माहिती राज्य सरकारला तरी आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे. निदान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी तरी हे रूग्णालय कोठे आणि केव्हा उभारले जाणार आहे याची माहिती जनतेला द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

चार वर्षांपुर्वी मोदींनी बिहार मध्ये दुसरे एम्स रूग्णालय उभारण्याची घोषणा केली होती पण त्याला किमान दोनशे एकर जागा लागते ती जागाच उपलब्ध नसल्याने तो प्रकल्प तेव्हा पासून रखडला आहे आज पुन्हा एकदा मोदींनी तीच घोषणा केल्याने त्यावरून तेजस्वी यादव यांनी ही संधी साधली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.