कोविडसाठीची रुग्णवाहिका कुठंय?

पुरंदर तालुक्‍यात नुसत्याच घोषणा

नीरा -पुरंदर तालुक्‍यात कोविड रुग्णवाहिकेच्या बाबतीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जनता हैराण झाली आहे. करोनाच्या बाबतीत उपाय योजना करताना प्रशासनाकडून अनेक चुका होत असून पोलिसी खाक्‍या दाखवत लोकांना घाबरवण्याच काम पुरंदरच्या प्रशासनाकडून सुरू आहे. करोना पॉझिटिव्ह लोकांना आता तालुक्‍यात कोविडसाठी असलेली खास रुग्णवाहिका ही मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे आता लोकांना आठ ते 12 तसांपर्यंत वाट पाहूनही रुग्णवाहिका मिळेनाशी झाली आहे.

पुरंदर तालुक्‍यात कोविडचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत करोना व्यावास्थापानाबाबाची परस्थिती भयंकर होऊ लागली आहे. आता तालुक्‍यात दररोज सरासरी 50 ते 60 रुग्ण आढळून येत आहेत. नीरा येथे रविवारी (दि. 14 “होम टू होम’ सर्वे दरम्यान सहा जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र, या लोकांना आठ तास कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. विशेष म्हणजे यामध्ये नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका चालकाच्या सहा वर्षांच्या मुलीचा व शिपायाच्या कुटुंबातील काही जणांचा समावेश होता.

ज्याने आत्तापर्यंत अनेक आजारी लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले किंवा ज्यांनी उपचारासाठी मदत केली त्यांच्याच कुटुंबातील लोकांना आर्धी रात्र प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर ताटकळत उभे रहावे लागले. हे पुरंदरच्या आरोग्य यंत्रणेच अपयश आहे. हे असेच सुरू राहीले तर पुरंदरमध्ये भयंकर परिस्थिती पाहायला मिळू शकते. तेव्हा प्रशासनाने आताच जागे व्हायला हवे, अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागणार हे निश्‍चित.

तुमच्या वाहनाने कोविड सेंटर गाठा
पुरंदरमध्ये जेजुरी ग्रामीण रुग्णालय मध्ये 108 ची कोविडसाठी एक रुग्णवाहिका आहे ही रुग्णवाहिका गेली आठ दिवस बंद आहे, त्यामुळे 108 ला फोन केल्यानंतर पुणे किंवा बारामती येथून रुग्णवाहिका येते. त्यामुळे पुरंदरमध्ये रुग्णवाहिका यायला वेळ लागतो आणि रुग्णांना ताटकळत राहावे लागते. प्रशासन मात्र याकडे लक्ष न देता तुमच्या वाहनाने कोविड सेंटरपर्यंत जाण्याचा सल्ला देत असल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यात मदतच होत आहे.

108 ची रुग्णवाहिका उशिरा येत असेल तर त्याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार करायला हवी. पुरंदरसाठी आम्ही आता दोन रुग्णवाहिका भाड्याने घेत आहोत. तर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आता स्वतंत्र रुग्णवाहिका खरेदी करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काळात लोकांना समस्या निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.
– डॉ. विविक आबनावे, वैद्यकीय अधिकारी, पुरंदर तालुका

Leave A Reply

Your email address will not be published.