Pune : २५ फेब्रुवारी या दिवशी स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून अटकी केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याचे रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, पोलिसांना अद्यापर्यंत गाडेचा मोबाईलचा शोध लावण्यात यश आलेली नाही. तसेच DNA चाचणीचा अहवाल अजूनही प्रतिक्षेतच आहे. यामुळे आरोपीला अटक होऊन त्याच्या विरोधातील महत्वाचा पुरावा असलेला मोबाईल फोन पोलिसांच्या हाती केव्हा लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्वारगेट पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र, पुणे पोलिसांकडून आरोपीची करण्यात आलेल्या DNA चाचणीचा अहवाल अजूनही प्रतिक्षेतच आहे. दत्ता गाडेच्या DNA चाचणीतून अनेक बाबी समोर आल्या होत्या. पीडितेवरून आरोपीने दोनदा अत्याचार केल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेज, ससून रुग्णालयातील अहवाल प्राप्त झाले असून, केवळ आरोपी दत्ता गाडे याचा डीएनए चाचणीचा अहवाल पोलिसांना अजून प्राप्त झालेला नाही. त्यामुळेच आरोपींविरोधात अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही.
मोबाईल फोन कधी भेटणार?
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी आरोपी दत्ता गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावी मोबाईलाचा शोध घेण्यासाठी नेले होते. मात्र, गाडे हा पोलिसांना उडावाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरोपीचा मोबाईल फ़ोन, जो एक ठोस पुरावा आहे या सगळ्या प्रकरणातला, तोच अजून पोलिसांना प्राप्त झालेला नाही.
हेही वाचा: स्वारगेट प्रकरणातील पीडितीने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; म्हणाली आरोपीला…