…तेव्हा कुठे होत्या रहाटकर : ऍड. चव्हाण

 सुळे यांच्याबाबत केलेल्या टीकेचा घेतला समाचार

पुणे –आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या सुसंस्कृतपणावरून टीका करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आधी सुळेंच्या खासदारकीच्या कारकिर्दीचा अभ्यास करावा आणि मगच बोलावे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सुळे यांच्याबाबत केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
राष्ट्रवादीचे माजी कार्यकर्ते राहूल शेवाळे यांना सुळे यांनी धमकावल्याच्या कथीतप्रकरणी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या रहाटकर यांनी “बारामतीत पराभव दिसू लागल्याने सुळे यांच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांची भाषा सुसंस्कृत पणाची नाही तर शिवराळ आहे’, अशी टीका केली होती. रहाटकर यांच्या या वक्तव्याचा चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला.

वंदना चव्हाण म्हणाल्या, सुप्रिया सुळे या अतिशय कार्यक्षम प्रतिनिधी आहेत, म्हणूनच त्यांना “संसद-रत्न’ पुरस्कार मिळाला. त्यांनी प्रत्यक्ष मतदारांशी नाळ जोडली आहे. त्यामुळे त्यांना कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ज्यावेळी पुण्याचे भाजपचे उमेदवार महिलांबाबत अपशब्द वापरत होते. तेव्हा आम्ही आंदोलने केली. मात्र, त्यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर कुठे गेल्या होत्या, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच, सुळे यांच्या कामाची माहिती रहाटकर यांना हवी असेल तर त्यांनी पुण्याचे खासदार अनिल शिरोळे आणि सुप्रिया सुळे यांची पाच वर्षांतील कामांची तुलना करून पहावी म्हणजे त्यांना काही सांगायची गरज लागणार नाही. त्यामुळे त्यांनी पुण्यात येऊन सुसंस्कृतपणा शिकविण्याची गरज नाही, असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.