सुष्मिता रोहमनसह लग्न कधी करणार ?

मुंबई –  बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची लव्ह लाईफ सध्या चर्चेत आहे.  सुष्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमनचे आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमीच  फोटो शेअर करत असते.  ते दोघेही इन्टाग्रामवर आय लव्ह यू म्हणत  तर कधी ‘यस शी इज माईन’ असे फोटोवर कॉमेंट करत त्यांनी नेहमीच आपल्या प्रेमाच्या दुजोरा दिला आहे.

यातच गुरुवारी सुष्मिता इन्स्टाग्रामवर लाइव्ह आली, त्यावेळी रोहमनही तिच्यासह होता. या लाइव्हमध्ये सुष्मिताला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यापैकी एक म्हणजे तिचं लग्न  … सुष्मिताला एका चाहत्याने तिच्या लग्नाबाबत विचारलं. सुष्मिता रोहमनसह लग्न कधी करणार असा प्रश्न या चाहत्याने विचारला आणि मग फक्त सुष्मिताच नव्हे तर रोहमननेदेखील चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

आपल्या लग्नाबाबत चाहत्याकडून विचारणा झाल्यानंतर सुष्मिता सर्वात आधी रोहमनकडे पाहते आणि त्याला म्हणते तू सांग. यानंतर रोहमनेही मोठ्या चलाखीने या प्रश्नाचं उत्तर देतो. रोहमन म्हणतो बताते है पूछकर. रोहमनच्या या उत्तरानंतर त्याच्यासह सुष्मिताही हसू लागते. सुष्मिता यानंतर म्हणते, आम्ही शेजाऱ्याला विचारून सांगणार आहोत. असं ते म्हणाले  आहे यामुळे    सुष्मिताच्या लग्नाच्या चर्चा सध्या जोरदार रंगल्या आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.