2016 मध्ये Netflix या ओटीटी माध्यमावर एक अमेरिकन साय फाय सिरीज स्ट्रेंजर थिंग्ज रिलीज झाली होती. या सिरीजला भारतीय नागरिकांना देखील भरभरून प्रेम दिले. यानंतर 2017 आणि 2019 मध्ये वेबसिरीजचे आणखी दोन सीझन आले त्यांना देखील प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली. या सिरीजचे आतापर्यंत एकूण चार भाग प्रदर्शित झाले असून लवकरच याचवर्षी या वेबसिरीजचा पुढचा भाग प्रदर्शित करण्यात येणार आहे. यामुळे या भागाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागलेली आहे.
स्ट्रेंजर थिंग्ज ही वेबसिरीज कथेसाठी तसेच अनोखी पात्रे, नॉस्टॅल्जिक टोन आणि भयपट, नाटक, विज्ञान-कथा, गूढ आदी गोष्टी भरभरून सिरीजमध्ये दाखविण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये चौथ्या सीझनच्या यशानंतर, आता निर्मात्यांनी सायन्स फिक्शन सीरिजच्या पाचव्या आणि शेवटच्या सीझनबद्दल अपडेट दिली आहे. न्यूज 18 च्या बातमीनुसार, डफर ब्रदर्सने स्ट्रेंजर थिंग्ज सीझन 5 बद्दल माहिती देताना सांगितले की, हा हॉरर आणि साय-फाय मालिकेचा शेवटचा सीझन आहे आणि यासह हॉकिन्सची कथा इथेच संपेल.
निर्मात्यांनी अद्याप स्ट्रेंजर थिंग्जच्या पाचव्या आणि शेवटच्या सीजनची अधिकृत तारीख अद्यापर्यंत जाहीर केली नसली, तरी या वर्षाच्या अखेरीस वेबसिरीजचा पाचवा भाग नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगितले जाते. निर्मात्यांनी स्ट्रेंजर थिंग्ज 5 (स्ट्रेंजर थिंग्ज नेटफ्लिक्स) च्या स्टार कास्टची माहितीही शेअर केली आहे. या सीझनमध्ये मिली बॉबी ब्राउन (इलेव्हन), फिन वोल्फहार्ड (माइक), नोहा स्नॅप (विल बायर्स), सॅडी सिंक (मॅक्स), डेव्हिड हार्बर (जिम हॉपर) आणि नतालिया डायर (नॅन्सी) यांच्या भूमिका आहेत.
या सीझनच्या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी वेबसिरीज उत्सुकतेने पाहणाऱ्या चाहत्यांना स्ट्रेंजर थिंग्जच्या सीझनमध्ये अनेक सरप्राईज पाहायला मिळतील, असे आश्वासनही दिले आहे. हा सीझन सस्पेन्स आणि इमोशनने भरलेला असणार असल्याचे देखील निर्मात्यांनी जाहीर केले आहे.