-->

जलसंपदा मंत्री जयंत पाटील गायक बनतात तेव्हा…!


इस्लामपूर (विनोद मोहिते) – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कौटुंबिक लग्न समारंभाच्या हळदी कार्यक्रमात गायलेले गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.मंत्री पाटील यांच्यातील गायनाचा कलागुण यानिमित्ताने समोर आला आहे. संगीत प्रेमी असणाऱ्या जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असणाऱ्या आविष्कार कल्चरल ग्रुपच्या व्यासपीठावर गायलेल्या गाण्याची आठवण कार्यकर्त्यांना झाली. 

कोल्हापूर येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ‘संगीत संध्या’ कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी गीत गायनाचा आनंद घेतला.’बुढ्ढा मिल गया’ या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले ‘रात कली एक ख्वॉब में आई’ हे गाणे त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री कौटुंबिक हळदी समारंभात गायलेले ही गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पाटील यांच्यातील गीतकार समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जलसंपदामंत्री जयंत पाटील हे संगीतप्रेमी असल्याची गोष्ट सर्वपरिचीत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अबकड व आविष्कार कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून देश पातळीवर असणाऱ्या नामांकित कलाकारांना ऐकण्याची संधी कला रसिकांना मिळत आहेत.

मैफील रंगल्यानंतर आप्तेष्टांनी जयंतरावांना एखादे आवडीचे गाणे सादर करण्यास सांगितले. त्यावेळी अंतरा व कडवे आठवत असलेले किशोर कुमार यांचे गीत त्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यांचा हा व्हिडिओ कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. तर अनेकांनी तो मोबाईल स्टेटेस् व फेसबुक स्टोरीला ठेवला आहे. त्याला अनेकजण दाद देत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.