एटीएम वापरताना…

नोटबंदीनंतर एटीएम वापरणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. एटीएममध्ये जाताना अजूनही अनेक जण घाबरतात, त्यांच्यासाठी…

–  एटीएम वापरणे अगदी सोपे आहे.

–  कार्ड कसे वापरावे (कोणती बाजू आत टाकावी, याचे चित्र तेथे असते.) हे लक्षात नाही आले तरी योग्य पद्धतीने वापरले तरच व्यवहार सुरु होतो. तोपर्यंत काहीच होत नाही.

–  नव्या प्रकारच्या एटीएममध्ये कार्ड आत टाकले की ते पैसे मिळाल्यावरच काढता येते. असे कार्ड आत सरकावल्यास खट असा आवाज येतो.

–  फार घाई करण्याचे कारण नाही, कारण सर्व नोंदी करण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला असतो.

– काही एटीएम जुने झाल्याने आपण केलेल्या नोंदी स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे त्या काळजीपूर्वक पाहाव्या लागतात.

–  पैसे मिळाल्यास तुम्हाला खात्यातील शिल्लक जाणून घ्यायची आहे का, असा एक संदेश येतो. त्याचा लाभ घेतल्यानंतर तुमचा व्यवहार संपतो.

–  व्यवहार पूर्ण झाला असेल तर कार्ड काढून घेता येते. ते आठवणीने काढून घ्यावे.

–  आपण कार्ड काढून घेतले की एटीएमचा व्यवहार संपलेला असतो. त्यामुळे एटीएम मशीनवरील कॅन्सल किंवा क्लीअर बटन दाबण्याची गरज नाही. अर्थात, ते दाबून बाहेर पडल्यावर आपल्याला अधिक सुरक्षित वाटते.

–  पैसे काढल्यावर मोबाईलवर लगेच मेसेज येतो, पण तो न आल्यास घाबरण्याचे कारण नाही. कारण काही बँकांचे मेसेज येण्यास वेळ लागतो.

Leave A Reply

Your email address will not be published.