जेव्हा पंचायत समितीमध्ये शाळा भरते!

खोल्या नसल्याने शेडगाव येथील शाळा भरते झाडाखाली

श्रीगोंदा – तालुक्‍यातील शेडगाव येथील प्राथमिक शाळेला वर्गखोल्या नसल्याने झाडाखाली बसून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सतत पाठपुरावा करून देखील वर्गखोल्या मिळत नसल्याने मंगळवारी (दि.2) पालकांनी थेट पंचायत समितीच्या सभागृहात विद्यार्थ्यांना बसवून शाळा भरवली. यामुळे पंचायत समिती प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली.

तालुक्‍यातील शेडगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे तर ठिकाणी इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वीच्या मुलांना बसण्याच्या योग्य नाहीत, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिल्यापासून आज तागयेत 3 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने नसल्याने मागील काही दिवसांपूर्वी शाळेची दयनीय अवस्था झाल्याच्या बातम्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाशित झाल्यावर काही अधिकाऱ्यांनी शाळेला भेटी दिल्या. मात्र, त्या भेटी निसफळ ठरल्या.

नुसती आस्वासनाची खैरात वाटण्यात आली, मात्र ठोस निर्णय न दिल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समितीच्या प्रांगणात शाळा भरविण्यात आली. त्यावेळी प्रशासनाची मोठ्या प्रमाणात धांदल उडालेली पाहण्यास मिळाली. या आंदोलनात मुंबई मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब नाहटा, शेडगावचे सरपंच विजयराव शेंडे, विजय रसाळ, प्रमोद भोपळे, आप्पा शेंडे, गणेश भुजबळ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन भोसले, आबा मेहत्रे, विजय रसाळ , यशवंतराव जगताप आदी उपस्थित होते.

शेडगाव या ठिकाणी इयत्ता 5 वी, 6 वी, 7 वी या तीन वर्गाला बसण्यासाठी वर्गखोल्या नसल्याने मुले झाडाखाली बसून धडे गिरवत आहेत. त्यामुळे त्यांना वर्ग खोल्या मिळवून देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे.

विजयराव शेंडे सरपंच, शेडगाव. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)