काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना ना देशाचा विकास झाला ना राज्याचा: बापट

पुणे: भाजपा शिवसेना महायुतीचे पुण्याचे उमेदवार गिरीश बापट यांची वडगाव शेरी तसेच कॅन्टोमेंट येथील महात्मा फुले विद्यालयात सभा झाली.  या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी गिरीश बापट यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली.

बापट म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची प्रगती होत आहे. पुणे महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर पुण्याचा ही मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

वर्षानुवर्षे देशात, राज्यात आणि महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र त्यांच्या काळात ना देशाचा, ना राज्याचा, ना शहराचा विकास झाला. भाजपा लोकांचा विकास करू शकतो या बद्दल लोकांना विश्वास वाटतोय, असे गिरीश बापट म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.