मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच आता त्यानी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे त्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराशी केवळ टिकली लावली नाही म्हणून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी मंत्रालयामध्ये घडला. या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आणि त्यांच्यावर टीकाही झाली.
जेव्हा सुधा मुर्ती या संभाजी भिडे गुरुजींच्या चरणी नतमस्तक होवून आशीर्वाद घेतात! pic.twitter.com/tm3pr93NWu
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) November 7, 2022
अशातच दुसरीकडे इन्फोसिसच्या प्रमुख सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंच्या पाया पडल्याचा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. काल सुधा मूर्ती या सांगलीमध्ये त्यांचा जुन्या घरी गेल्या होत्या यावेळी संभाजी भिडे यांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांच्या पायाही पडल्या. यावेळी दोघांमध्ये चार ते पाच मिनिटं चर्चाही झाली. त्यानंतर सुधा मूर्ती संभाजी भिडेंच्या पाया पडल्या. त्यामुळे आता सोशल मीडियावर याची चर्चा सुरू आहे. यावेळी सुधा मूर्ती मराठमोळ्या पेहरावात दिसल्या. त्यांनी साडी, नथ, तसंच केसांत गजराही माळला होता. दरम्यान महिला आयोगाने कारवाईची नोटीसही पाठवली आहे. हा वाद अजूनही ताजाच असताना त्यामुळे सोशल मीडियावर काही युजर्सकडून सुधा मूर्ती यांच्यावर टीकाही होत आहे.