#video#राहुल गांधी जेंव्हा लहान मुलांसोबत क्रिकेट खेळतात…

नवी दिल्ली : देशात सध्या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारासाठी सर्वच नेते गुंतले आहेत. या सर्व गोंधळात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ समोर येत आहे. यात राहुल गांधी चक्‍क लहान मुलांसमवेत क्रिकेट खेळताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला असल्याचे सांगण्यात येत आहे.


राहुल गांधी सध्या हरयाणा येथे प्रचार करत आहेत. प्रचारासाठी जात असताना राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅन्डिग करावे लागले. केएलपी कॉलेज या ठिकाणी हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. हरयाणा या ठिकाणी राहुल गांधी प्रचारासाठी आले होते. तिथून हेलिकॉप्टरने दिल्लीला जात असताना ढगाळ वातावरण आणि खराब हवामान यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅन्डिग करावे लागले. त्यावेळी राहुल गांधी यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. महाराष्ट्रातही ते आले होते, मात्र महाराष्ट्रातला त्यांचा दौरा लगेचच आटोपला. हरयाणा या ठिकाणी असलेल्या महेंद्रगडमध्ये त्यांची प्रचारसभा होती. ती झाल्यावर राहुल गांधी परत निघाले होते. दिल्लीला हेलिकॉप्टरने जात असताना खराब हवामानामुळे केएलपी कॉलेज या ठिकाणी त्यांचे हेलिकॉप्टर उतरवावे लागले. ज्यानंतर राहुल गांधी यांनी क्रिकेटचा आनंद लुटला. राहुल गांधी बॅटिंग करत असतानाचा एक व्हिडीओही एएनआयने ट्‌विट केला आहे. यामध्ये एक स्टंप मागे लावून राहुल गांधी बॅटिंग करताना दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.