नवी दिल्ली – उद्या 15 आॅगस्ट 2020 दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतील, त्यावेळी राजकीय इतिहासात एका नव्या विक्रमांची नोंद करतील.
पंतप्रधान मोदी सलग सातव्यांदा तिरंगा फडकावतील आणि यासह हा बहुमान मिळवणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत ते चौथ्या क्रमांकावर पोहोचतील. लाल किल्ल्यावर अधिक वेळा तिरंगा फडकवण्याचा विक्रम(बहुमान) हा प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी दुसर्या क्रमांकावर आणि मनमोहन सिंग तिसर्या क्रमांकावर आहेत.
पंडित नेहरु यांनी 17 वेळा तर इंदिरा गांधी यांनी 16 वेळा पंतप्रधान म्हणून ध्वजारोहण केले. त्यातही इंदिरा गांधी यांनी सलग 11 वेळा पंतप्रधान म्हणून तिरंगा फडकाविला होता. मनमोहनसिंग यांच्या आधीचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 1998 ते 2003 या कालावधीत सहा वेळा तिरंगा फडकाविला.