मावळ तहसील कार्यालयाच्या इमारतीला मुहूर्त कधी?

वडगाव मावळ – मावळ तहसील कार्यालयाला सुसज्ज इमारत नसल्याने अपुऱ्या जागेत ब्रिटिशकालीन इमारतीत कार्यालय सुरू आहे. विविध विभागांची वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये असल्याने कामकाजात सुसूत्रतेचा अभाव आहे. कार्यालयांमुळे काही कार्यालये इतरत्र भाड्याच्या खोलीत असल्यानेगैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

हे तहसील कार्यालय वार्षिक 30 कोटी रुपयांचा महसूल जमा करून देते. येथे तहसीलदार कार्यालय, निवासी नायब तहसीलदार कार्यालय, महसूल नायब तहसीलदार कार्यालय, निवडणूक नायब तहसीलदार कार्यालय, संजय गांधी निराधार शाखा, शिधा पुरवठा, अभिलेख कक्ष, कुळ कायदा शाखा, नागरी सुविधा केंद्र आदी कार्यालय ब्रिटीशकालीन इमारतीत असून ही जागा अपुरी आहे. त्यातच दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी कार्यालय, सामाजिक वनीकरण, विद्युत विभाग, पोस्ट, मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय इतरत्र असल्याने नागरिकांना शोधण्यासाठी वेळ वाया जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.