नाशिक – अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेंव्हा ते खासदार देखील नव्हते’ असा निशाणा भुजबळ यांनी राऊत यांना लगावला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, ‘पाहुणचार देण्याघेण्याची सवय आहे. सन्माननीय संजय राऊत हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहे. त्यामुळे या शिल्पाला तडा जाऊ नये याची जबाबदारी शिल्पकाराची अधिक आहे. शिवसेनेत मुख्यमंत्री झालो असतो असे म्हटले, हे मात्र कुणालाही मान्य होणार नाही. पक्षात काम केल्या शिवाय जबाबदारी मिळत नाही. संजय राऊत राऊत यांनाही सामनाच संपादक काम केल्यानेच केले आहे. मी जेव्हा शिवसेना मोठी केली तेंव्हा ते खासदार देखील नव्हते.
‘नांदगाव मतदारसंघ, विसरा अस ते म्हणाले या बाबत मला पवार साहेबांशी बोलावे लागेल. नांदगावमध्ये मी जे काम केले ते त्यांना माहीत नसावं कारण त्यांना गल्ली पासून दिल्ली पर्यंत काम करावे लागते. त्यामुळे मी त्यांना आमंत्रित करतो त्यांनी या मतदारसंघात परत परत यावे, असा खोचक टोलाही भुजबळांनी राऊतांना लगावला.
‘आमचे नेते जयंत पाटील देखील तेथे येऊन गेले त्यांनीही 100 प्लस आमदार निवडून आणण्याचे आव्हान केले आहे, असेही भुजबळ म्हणाले.
संजय राऊतांनी नाशिक दौऱ्यावर असताना छगन भुजबळ यांना टार्गेट केले होते. त्यावेळी मी शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो, भुजबळांच्या या वक्त्यांव्यावर राऊत यांनी शिवसेनेच्या पुण्याईवर तुमचे राजकारण सुरू असून जर आघाडी सरकार सत्तेवर आले नसते तर तुम्ही पालकमंत्री झाले नसते, असा टोला लगावला होता. त्यावर छगन भुजबळ यांनी राऊतांना सणसणीत टोला लगावला आहे.