जेव्हा क्रिकेटचा देव होतो गुरु समोर नतमस्तक

विक्रमादित्य, मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा देव अश्या अनेक टोपण नावाने ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर हा त्याच्या खेळाव्यतिरिक्त देखील अनेक कारणांसाठी ओळखला जातो. तो त्याच्या नम्र आणि यशाच्या शिखरावर असून देखील जमिनीशी नाळ जोडण्यासाठी देखील ओळखला जातो. त्याच बरोबर तो ओळखला जातो त्याच्या गुरु विषयीच्या प्रेमासाठी.

सचीन याने आज गुरु-पौर्णिमेचे औचित्य साधून आपले गुरु रमाकांत आचरेकर गुरुजी यांची त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. त्याचबरोबर त्याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून त्याबद्दलचे फोटो देखील शेअर केले. या ट्विटमध्ये त्याने असेही सांगितले की,” मी हे सगळे तुमच्या शिवाय करू शकलो नसतो.”
सचीन नेहमीच आपल्या यशाचे श्रेय आपल्या गुरूच्या नावे करताना आपणास अनेकदा दिसला असेल. त्याच बरोबर स्वतःच्या ‘प्लेयिंग इट माय वे’ या आत्मचरित्रात देखील त्याने कित्येक ठिकाणी गुरूंचा उल्लेख केला आहे आणि यशाचे श्रेय दिले आहे.

https://twitter.com/sachin_rt/status/1022802896352673793

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)